Share

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह रुग्णालयात दाखल

Published On: 

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी अनेक चित्रपटामध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाची एक वेगळीच जादू आहे. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मात्र नसीरुद्दीन शाह गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील एका रुग्णालयात दाखल असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान त्यांच्या सेक्रेटरीने सांगितले की,नसीरुद्दीन शाह गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखी खाली उपचार सुरू आहेत. त्यांना न्युमोनिया झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या फुफ्फुसात पॅच दिसला आहे त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रत्ना पाठक आणि मुले आहेत.

https://www.instagram.com/p/BmlQAgYgOsG/?utm_source=ig_embed&ig_rid=eedf78c5-65a3-4a8f-9136-14665fdaa33b

नसीरुद्दीन शाह हे ७० वर्षांचे आहेत. त्यांनी १९७५ साली निशांत चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर शेवटचे ते राम प्रसाद की तेरहवी या चित्रपटात झळकले होते. त्यांनी अनेक चित्रपटात उत्तम काम करत स्वतः ची अशी एक खास ओळख निर्माण केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!