Share

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार आहे हे संजय राऊत वारंवार का सांगत असतात ?

Published On: 

पुणे – महाविकास आघाडीत सध्या छुपे शीतयुद्ध सुरु आहे. श्रेयवाद ते ब्लेमगेम हे सर्व काही सरकारमध्ये सुरु असल्याचे वारंवार समोर येते. यामुळेच कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षात अविश्वासाचे वातावरण तयार झाले असून सर्व पक्ष एकमेकांकडे संशयाने पाहू लागले आहेत असे सध्या दिसून येत आहे.

अंतर्गत कुरघोड्या सुरु असूनही महाविकास आघाडीतील नेते मात्र सर्वकाही ठीक असल्याचे माध्यमांना सांगत आहेत. या नेत्यांमध्ये प्रामुख्याने खा. संजय राऊत यांचे नाव येते. राऊत हे माध्यमांशी जेव्हा संवाद साधतात तेव्हा हमखास महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचे सांगतात. जर राऊत म्हणतात त्याप्रमाणे सरकार खरंच स्थिर असेल तर मग वारंवार सांगायची का आवश्यकता भासते आहे हा मुख्य सवाल आहे.

याबाबत चर्चा करायची झाल्यास प्रथमदर्शनी तर असे दिसून येते की, राऊत हे अशा प्रकारचे दावे करून  तिन्ही पक्षातील नेत्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न  करत असतात. त्यांच्या या दाव्यातून आम्ही सर्व एकत्र आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जातो. राऊत यांनी दावा केल्याप्रमाणे खरंच महाविकास आघाडीत सर्वकाही ठीक चालले आहे का याचा विचार करायचा झाल्यास  गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी जर पहिल्या तर सरकारमध्ये नेमके काय चालले आहे याचा अंदाज येऊ शकतो.

काहीदिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणिखा. शरद पवारांची अहमदाबादमध्ये भेट झाल्याची चर्चा होती. शाहांनी या भेटीवर अधिक बोलणं टाळलं पण मीडियावर भेट नाकारली नाही यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. काही दिवसांआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जवळीक वाढत असल्याचं बोललं जात होतं. या भेटीगाठीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत शंकेचं वातावरण निर्माण झालं होतं. मध्येच पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु होतात तर कधी शिवसेनेकडून जाणूनबुजून कॉंग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतल्या कुरबूरीवरुनही मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा होत असते यामुळे सरकार पडतेय की काय अशी भीती नेते आणि कार्यकर्त्यांना वाटू लागते ही भीती आणि संभ्रम दूर करण्यासाठी राऊत हे सरकार स्थिर असल्याचा दावा करत असतात.

राऊत यांची जबाबदारी इथेच संपत नाही विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपकडून काही हल्ला झाला किंवा सरकारमध्ये काही कुरबुर सुरु होताच राऊत यांनाच बचाव करण्यासाठी पुढे यावे लागते.  महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना संजय राऊत यांचा महत्वाचा रोल निभावला होता. यामुळेच सरकारमधील मतभेद,अंतर्गत वाद,हेवेदावे हे सर्व काही लपविण्यासाठी राऊत यांना माध्यमांच्या समोर येत महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही ठीक चालले आहे आणि हे सरकार पाच वर्षे  टिकणार आहे हे सांगावे लागते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!