Share

तालिबान्यांनी दाखवले खरे रंग; अफगाणी नागरिकांवर चाबूक, धारदार शस्त्रांनी हल्ला

Published On: 

नवी दिल्ली : तालिबानने अफागाणिस्तान ताब्यात घेतलं आणि फक्त अफगाणीच नाही तर संपूर्ण जगाला तालिबान्याची भीती वाटू लागली. तालिबानने अफगाण ताब्यात घेलत्यानंतर सर्वांनाच ज्याची भीती होती तेच चित्र आता समोर आले आहे.

अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर तालिबान क्रूरता दाखवणार नाही असा दावा करत होते पण आता तालिबान्यांनी आपले खरे रंग दाखवण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तालिबानी दहशतवागी अफगाणी नागरिकांना चाबकाने मारहाण करत असताना दिसत आहेत.

अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचलेल्या लोकांना विमानतळावर जाण्यास बंदी घालून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केल्याचेही समोर आले आहे. गुरुवारी रात्री काबूल विमानतळावर परत गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे.

अफगाणिस्तानला ताब्यात घेतल्यावर तालिबानने भारताची आयात निर्यातीवर बंदी घातली आहे. तालिबानने सध्या पाकिस्तानच्या पारगमन मार्गांवरून सर्व माल वाहतुकीवर बंदी घातली आहे. भारत अफगाणिस्तानला साखर, औषधी, चहा, कॉफी, मसाले आणि ट्रान्समिशन टॉवर निर्यात करतो. त्याचबरोबर अफगाणिस्तानातून सुकामेवा आणि कांदा यासारख्या वस्तू आयात केल्या जातात, असे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्सचे महासंचालक डॉ. अजय सहाय यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!