Share

Salaam Venky Trailer | माय-लेकाच्या कथेवर आधारित चित्रपट ‘सलाम वेंकी’चा ट्रेलर झाला रिलीज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री काजोल (Kajol) सध्या तिच्या आगामी चित्रपट सलाम वेंकी (Salaam Venky) मुळे चर्चेत आहेत. नुकताच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडल वरून या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले होते. तर आज मुंबईमध्ये बाल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका खास कार्यक्रमांमध्ये सलाम वेंकी या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) लाँच करण्यात आला आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. ज्यामध्ये एक आई आणि लेकाचे नाते दाखवले आहे. आपल्या मुलाला येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना कसा करायचा आणि त्याला आयुष्य जगण्यास कसे प्रेरित करायचे हे या चित्रपटात मध्ये दाखवण्यात आले आहे.

सलाम वेंकी (Salaam Venky) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

दिग्दर्शक रेवती दिग्दर्शित सलाम वेंकी या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच प्रभावशील आहे. या चित्रपटांमध्ये काजोल आईच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. चिपटातील तिच्या या पात्राचे नाव सुजाता आहे. तर अभिनेता विशाल जेठवा या चित्रपटांमध्ये व्यंकटेश उर्फ वेंकी म्हणून दाखवण्यात आलेला आहे. विशाल या चित्रपटामध्ये काजोलचा मुलगा झालेला आहे. या चित्रपटांमध्ये माय-लेकाचं खास नातं दाखवण्यात आलं आहे.

सलाम वेंकी या चित्रपटाचा ट्रेलरची सुरुवात आई आणि मुलाच्या हसण्याने होते. यामध्ये ते दोघे ‘जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये बाबूमोशाय’ हा राजेश खन्नाचा डायलॉग बोलताना दिसत आहे. दरम्यान, वेंकी हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. चित्रपटाचा हा ट्रेलर ह्रदयस्पर्शी क्षणांनी भरलेला असून वेंकी कसा आपल्या जीवनातील आव्हानांना हसतमुखाने सामोरे जातो याबद्दल दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर एक आई म्हणून काजोल तिच्या मुलाला उत्साहात ठेवते आणि प्रत्येक अडचणी मध्ये त्याला साथ देते.

सलाम वेंकी कधी होणार रिलीज

बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि अभिनेता विशाल जेठवा यांचा हा हृदयस्पर्शी चित्रपट सलाम वेंकी 9 डिसेंबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे. या चित्रपटांमध्ये काजल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये राजीव खंडेलवाल आणि आहाना कुर्मा देखील दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!