🕒 1 min read
Chandrashekhar Bawankule | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. तसेच पोलिसांनी आपल्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांमुळे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे आव्हाड म्हणाले. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या निलंबणाची मागणी केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नैतिकता असले तर त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करावे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर जेवढे गुन्हे दाखल झाले. त्याचे फुटेज उपलब्ध आहे. या महाराष्ट्रात तुम्ही काहीही कराल का? आता दिलीप वळसे पाटील गृहमंत्री नाहीत तर देवेंद्र फडणवीस आहेत. शरद पवार, अजित पवार यांना माझी विनंती आहे. जितेंद्र आव्हाडांना निलंबित करा.”
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटे गुन्हे दाखल केले. यामध्ये ३५४ चा देखील समावेश आहे. मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. उघड्या डोळ्यांनी लोकशाहीची हत्या नाही बघू शकत”
जितेंद्र आव्हाड यांचे वेडे चाळे सुरू-
निर्दोषत्व सिद्ध करु शकत नसल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचे वेडे चाळे सुरू असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे. “चोरी पकडली गेली म्हणून पोलिसांना दोष दिला जात असल्याची टीका शेलारांनी केली. आमदारकीचा राजीनामा देणे आणि प्रत्यक्षात पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेले आरोप याचा काय सबंध आहे. ‘हे म्हणजे चर्चगेटच्या गाडीत बसून मुलुंडचं स्टेशन आलं का, असं विचारण्यासारखे आहे.’ जर जितेंद्र आव्हाड निर्दोष आहेत तर त्यांनी कायदेशीर बाजू लढावी. प्रत्येक निर्दोष व्यक्तीला आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्याची मुभा असते. निर्दोषत्व सिद्ध करता येत नसेल तेव्हा असे वेडे चाळे सूचतात”, अशी टीका शेलार यांनी केली.
राजीनामा द्यायचा असेल तर द्या-
आमदारकीचा राजीनामा आणि या प्रकरणाचा काही सबंध नाही आणि राजीनामा द्यायचा असेल तर द्या, ती जागा आम्ही जिंकून येऊ, असा दावा देखील आशिष शेलार यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. यावर आशिष शेलार यांनी पलटवार केला. सामान्य महाराष्ट्रातल्या मराठी कुटुंबाला, आरोप प्रत्यारोप, विनयभंग, दादागिरी करू नये. असं केल्यास त्यावर कायदेशीर बडगा आहे. हे गृहमंत्र्यांनी दाखवलंय. म्हणून त्यांचं स्वागत आणि अभिनंदन आम्ही करतोय, असे शेलार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | “जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला”; जयंत पाटलांनी दिली माहिती
- Sunil Shende Death | दिग्गज अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन, बॉलीवूड मध्ये पसरली शोककळा
- Hera Pheri 3 | अक्षय कुमारने सांगितले हेरा फेरी 3 नाकारण्याचे कारण, म्हणाला…
- Gunratna Sadavarte | “नक्षली संघटनेच्या बैठकीत माझी हत्या करण्याचा निर्णय झाला होता”; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा
- Ashish Shelar | “राजीनामा द्यायचा आहे तर द्या, ती जागा देखील आम्ही जिंकू” ; आशिष शेलारांचा आव्हाडांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
