Share

Hera Pheri 3 | अक्षय कुमारने सांगितले हेरा फेरी 3 नाकारण्याचे कारण, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा हेरा फेरी (Hera Pheri) हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. बॉलीवूड मधील सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणून त्याची ओळख आहे. हेराफेरी या चित्रपटाचा प्रथम भाग 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर अक्षय कुमार (Akshay Kumar), सुनील शेट्टी (Sunil Shetty)आणि परेश रावल (Paresh Rawal) यांची मनोरंजनाचे बादशाह म्हणून ओळख निर्माण झाली होती. तर या फ्रेंचाईजीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी 2’ 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळे आता प्रेक्षक या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे.

दरम्यान, अलीकडेच परेश रावल यांनी सोशल मीडियावर ट्विट करून माहिती दिली होती की हेरा फेरीच्या तिसऱ्या भागामध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aryan) ला घेण्यात आले आहे. ही माहिती समोर येतात, अक्षय कुमारचे चाहते संतप्त झाले आहे. त्याचबरोबर हा चित्रपट अक्षय कुमार शिवाय अपूर्ण राहील अशी देखील चाहते म्हणत आहे. दरम्यान अक्षय कुमारचे चाहते नो हेराफेरी ट्रेंड हॅशटॅग ट्विटरवर व्हायरल करत आहे. कारण हेरा फेरी 3 हा चित्रपट अक्षय कुमार शिवाय फ्लॉप होईल असा लोक दावा करत आहे.

अक्षयने का नाकारला हेरा फेरी 3 (Hera Pheri 3)

हिंदुस्तान टाइम्सच्या 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या समिटला अक्षय कुमार उपस्थित होता. दरम्यान, त्याला हेरा फेरी विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना अक्षय कुमार म्हणाला की, “मी हेरा फेरी चा भाग राहिला आहे. अनेक लोकांच्या आठवणी या चित्रपटाबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाची माझ्याही चांगल्या आठवणी आहेत. मात्र, मला खेद वाटत आहे की इतक्या वर्षात आम्ही या चित्रपटाचा तिसरा भाग बनवला नाही. जेव्हा मला या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल कळाले तेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि स्क्रीन बघून मी समाधानी नव्हतो. त्यामुळे मी या चित्रपटातून बाहेर पडलो आहे.”

तर, दुसरीकडे या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या चित्रपटामध्ये बॉलीवूडचा सध्याचा सुपरस्टार कार्तिक आर्यन देखील दिसणार आहे. ही माहिती अभिनेता परेश रावल यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर दिली आहे. एका चाहत्याने त्यांना विचारले होते की सर कार्तिक आर्यन हेरा फेरीच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे का? परेश रावल यांनी त्याला रिप्लाय देत उत्तर दिले की, “होय, हे खरं आहे.” त्यांच्या या रिप्लाय ने कार्तिक आर्यन हेरा फेरी 3 मध्ये दिसणार असल्याची पुष्टी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!