🕒 1 min read
मुंबई: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी मध्ये अनेक भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुनील शेंडे (Sunil Shende) यांचे आज वयाच्या 75 व्या वर्षी निधन (Death) झाले. 14 नोव्हेंबर रोजी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी पारशीवाडा येथील स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सुनील शेंडे यांच्या पश्चात त्यांच्या परिवारामध्ये त्यांची पत्नी ज्योती आणि दोन मुले ऋषिकेश आणि ओंकार आहेत. सुनील शेंडे हे सरफरोश, गांधी, वास्तव इत्यादी बॉलीवूड चित्रांमध्ये दिसले होते.
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या टीव्ही शो ‘सर्कस’ मध्ये देखील सुनील शेंडे दिसले होते. ते त्यांच्या व्यक्तिरिकेसाठी ओळखले जात होते. त्यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांसह अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्यामधील त्यांची अनेक पात्रे आजही स्मरणात आहे.
सुनील शिंदे यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. त्याचबरोबर त्यांच्या निधनाने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. त्यांचे चाहते आणि बॉलीवूड कलाकार त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांच्या एका जवळच्या मित्राने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की,”हिंदी आणि मराठीतील अभिनय प्रसिद्ध करणारे अभिनेते सुनील शिंदे यांचे आज निधन झाले. गांधी या चित्रपटात छोटी भूमिका साकारल्यानंतर त्यांनी 80 आणि 90 च्या दशकांमध्ये हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. त्याचबरोबर टीव्ही शो सर्कस मध्ये त्यांची बापूजीची भूमिका नेहमी स्मरणात राहील.
मधुचंद्राची रात्र, निवडुंग, जसा बाप तशी पोर, नरसिंह, ईश्वर या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली होती. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या सहाय्यक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मराठी शिवाय त्यांनी वास्तव, गांधी आणि सरफरोश या हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- Hera Pheri 3 | अक्षय कुमारने सांगितले हेरा फेरी 3 नाकारण्याचे कारण, म्हणाला…
- Gunratna Sadavarte | “नक्षली संघटनेच्या बैठकीत माझी हत्या करण्याचा निर्णय झाला होता”; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा
- Ashish Shelar | “राजीनामा द्यायचा आहे तर द्या, ती जागा देखील आम्ही जिंकू” ; आशिष शेलारांचा आव्हाडांना टोला
- Rida Rashid | जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा नोंदवणाऱ्या रीदा राशीद यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- Vivo Mobile Launch | Vivo लवकरचं लाँच करत आहे ‘हा’ मोबाईल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

