Share

मनसुख हिरेन यांचा धक्कदायक मृत्यू ; केस तातडीनं एनआयएला ट्रान्सफर करा : फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक असलेली कार आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करून जाणाऱ्या लोकांचा शोध मुंबई पोलीसांकडून घेतला जात आहे. मात्र या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या घटनेसंबंधी शंकेला अनेक पुरावे समोर आल्याचंही फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं आहे.

‘या सर्व प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा मनसुख हिरेन हे होते. त्यांना तात्काळ सुरक्षा द्यायला हवी. मनसुख हिरेन यांची बॉडी ठाण्याजवळ मुंब्र्याच्या जवळपास सापडली आहे, त्यामुळे हे प्रकरण गंभीरच नाही तर अत्यंत गुंतागुंतीचं आणि सर्वांकरिता चॅलेंजिग आहे. मला वाटतं हा जो योगायोग आहे, यातून जो संशय तयार झालाय आणि इतका प्राईम विटनेसची बॉडी मिळते, निश्चितच यामध्ये काही गौडबंगाल आहे. त्यामुळे ही केस तात्काळ NIA ला दिली पाहिजे आणि यामागील सत्य बाहेर यायला हवं.’ असे मत विधानपरीषेदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी २५ फेब्रुवारीला सापडली होती. २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १ वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!