Share

Deepali Syyed Tweet : “आदित्य ठाकरे व श्रिकांत शिंदे यांनी…” ; दीपाली सय्यद यांचे ट्वीट करत आवाहन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर सध्या सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 12 वाजता मुंबईतील शिवसेना भवनात बैठक होणार आहे. दुसरीकडे, आज आणखी आमदार गुवाहाटीमध्ये पोहोचण्याची शक्यता असून एकनाथ शिंदे छावणीतील आमदारांची संख्या 50 च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आपल्याला शिवसेनेच्या 40 आमदारांचा पाठिंबा असून 50 हून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी आदित्य ठाकरे आणि श्रिकांत शिंदे यांना आवाहन केले आहे.

“शिवसैनिक कष्ट करतो आणि घरदार सांभाळून शिवसेना पक्ष वाढवतो. त्याला ना सत्तेचा लोभ, ना पैशाचा तो फक्त शिवसेनेचा पाईक आहे. माननीय आदित्य साहेब ठाकरे व श्रिकांत शिंदे साहेब यांनी ही जबाबदारी घेऊन कोसळणाऱ्या शिवसैनिकांना न्याय द्यावा. जय महाराष्ट्र!”, असे ट्वीट दीपाली सय्यद यांनी केले आहे.

यापूर्वी देखील राज्यातील राजकारणावर दीपाली सय्यद यांनी आपली भूमीका स्पष्ट केली आहे. “सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू”, अशी भूमिका दीपाली सय्यद यांनी घेतली होती.

“माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचं नाही लढायचं. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल, असे देखील दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!