Share

लोकांना जेवू घालणाऱ्यांवरच उपासमारीची वेळ

Published On: 

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना आटोक्यात आणण्यासाठी १७ मार्चपासून हॉटेल सेवा बंद करून केवळ डिलिव्हरी सेवा सुरू असणार, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जेऊ घालणाऱ्यावरच उपासमारीची वेळ येईल. हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मागील काही दिवसपासून औरंगाबाद शहर आणि ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमानात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, मागील दोन दिवसापासून तर आकड्यांनी सर्व विक्रम मोडीत काढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्क होऊन हॉटेल मध्ये मोठ्या प्रमाणात मास्क न लावता ग्राहक बसत असल्याने कोरोना संक्रमण होत होते. त्याच अनुशंगाने १७ मार्चपासून फक्त पार्सल सुविधा देण्यासाठी हॉटेल उघडे असणार असे आदेश काढण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, हॉटेल बंद केल्याने वेटर, कूक, सफाई कामगार आदींच्या रोजगारावर परिणाम होईल. हजारो कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. यासाठी हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!