🕒 1 min read
मुंबई : सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज गाडी एनआयएने जप्त केली असून यात नोटा मोजण्याचं मशीन सापडल्याची माहिती समोर आली आहे. एरवी बँकेत, दुकानात किंवा व्यापाऱ्यांकडून पैसे मोजण्यासाठी असे मशीन वापरले जाते. मात्र, सचिन वाझे आपल्या गाडीत पैसे मोजण्याचे मशीन का ठेवत होते, याबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आता या प्रकरणात एक नवा ट्वीस्ट आला असून जप्त केलेल्या या गाडीसोबत भाजप नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी यासंदर्भात काही फोटो देखील ट्वीट केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर, भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी हे आरोप धुडकावून लावत उलट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सचिन सावंत यांनीच ती गाडी घेण्यासाठी वाझेंना मदत केल्याची टीका केली आहे.
आशिष शेलार यांच्या या टीकेचा सचिन सावंत यांनी ट्विटरद्वारे समाचार घेतला आहे. ‘भाजपा नेत्यांना सत्ता गेल्यापासून मानसिक आजार झाला आहे. बेछूट आरोप करतात. त्या वाझेकडे एके ठिकाणी नोटांची मशीन आहे, त्याचे धंदे आहेत म्हणायचे, दुसरीकडे आम्ही मर्सिडीज घ्यायला मदत करतो असे म्हणायचे. तेही नाना पटोले आणि मी मिळून यांना मानसिक उपचारांची तात्काळ गरज आहे.’ अशी बोचरी टीका सावंत यांनी केली आहे.
भाजपा नेत्यांना सत्ता गेल्यापासून मानसिक आजार झाला आहे. बेछूट आरोप करतात. त्या वाझेकडे एके ठिकाणी नोटांची मशीन आहे, त्याचे धंदे आहेत म्हणायचे, दुसरीकडे आम्ही मर्सिडीज घ्यायला मदत करतो असे म्हणायचे. तेही @NANA_PATOLE आणि मी मिळून ????????
यांना मानसिक उपचारांची तात्काळ गरज आहे https://t.co/UiOTcAKYeB— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 17, 2021
आशिष शेलार यांचा आरोप –
सचिन सावंत यांच्या आरोपांना भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी चोख प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘नाना पटोले आणि सचिन सावंत यांनीच ‘ती’ मर्सिडीज घेण्यासाठी सचिन वाझेंना मदत केली, अशी माहिती समोर येते आहे. चौकशी स्वतःकडे येते की काय या भीतीने काँग्रेस नेते भाजपावर बिनबुडाचे आरोप करत आहेत.’ असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परमबीर सिंग यांची उचलबांगडी…राष्ट्रवादीने केली शिवसेनेवर कुरघोडी?
- परमबीर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; भाजपला दिला इशारा
- शरद पवार देशात निर्माण करणार तिसरी आघाडी; काँग्रेस एकाकी पडण्याचे चिन्ह
- वेदनेने विव्हळत अखेर ‘त्याने’ घाटीच्या पायरीवर सोडला प्राण
- पेट्रोलिंग करताना पोलिसांच्या गाडीचा अपघात, ७ जण जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
