पुणे : सेट नेट पीएचडी धारक संघर्ष समितीनं पुण्यातील उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर 21 जूनपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. प्राध्यपक भरती आणि मासिक मानधन पद्धत बंद करुन समान वेतन धोरण जाहीर करावे, या मागणीसाठी सीएचबी तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचं पुण्यात आंदोलन सुरु आहे. महाराष्ट्र सरकारनं प्राध्यापक भरतीवर बंदी घातलेली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात आंदोलन करणाऱ्या सेट नेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या आंदोलकांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज भेट घेतली.
या नंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी ते म्हणाले कि, ‘राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. वित्त विभागाकडून मंजूर मिळाल्यानंतर येत्या आठवड्याभरात ३ हजार ७४ पदांच्या जागा भरण्यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल.’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच यावेळी सामंत म्हणाले कि, ‘प्राध्यापक व ग्रंथपालांच्या रिक्त जागा भरण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून प्राध्यापक भरतीची फाईल अंतिम मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांची या फाईलवर आठवड्याभरात स्वाक्षरी होईल. त्यानंतर शिक्षण विभागाकडून प्राध्यापक भरतीचा अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल. त्यामुळे प्राध्यापकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.’ असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय पुढच्या निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत’; पंकजा मुंडे कडाडल्या
- ‘राज्य सरकार निवडणूक आयोगाला मनुष्यबळ देणार नाही, काय करायचं ते करा’
- शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी घेतली मुख्य सचिव कुंटे यांची भेट
- मेनका गांधींबद्दल भाजप नेत्याचे आक्षेपार्ह ट्वीट, वाद निर्माण होण्याची शक्यता
- ‘ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले पण मी केंद्रात प्रयत्न करणार’- आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

