🕒 1 min read
नागपूर : खासदार संजय राऊत यांची नागपुरात पत्रकार परिषद झाली असता. ईडीच्या कारवायांबद्दल राऊत म्हणाले, “केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय. मध्यमवर्गीय व्यक्तीवर आक्षेप घेण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होत आहेत”.
तसेच राऊत म्हणाले, अभिषेक बॅनर्जी यांना इडीनं दिल्लीत बोलावलं. मी झुकणार नाही, असं बॅनर्जी म्हणाले. हा राजकीय गैरवापर होतो. भाजपचं राज्य नसणाऱ्या ठिकाणीचं ईडीची कारवाई होते. सात वर्षात तेवीस हजार धाडी पडल्या. महाराष्ट्र, बंगालमध्ये सत्ता पाडू, असं भाजपचं स्वप्न आहे. पण, आम्ही वाकणार नाही, मोडणारही नाही. आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
विदर्भ, मराठवाड्यात संवाद साधणार –
“पत्रकार परिषदेला पाच दहा हजार लोकं असतात. शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू आहे. विदर्भ-मराठवाडा येथे शिवसेनेच्या खासदारांनी जावं, संवाद साधावा, हा यामागचा उद्देश आहे. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जात आहे. माझ्या बाजूला रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आहेत. खासदार राहुल शेवाडे हे गडचिरोलीला जाणार आहेत. तिथे ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. संसदेचे अधिवेशन सुरू असल्यानं राष्ट्रीय नेते दिल्लीत असल्याचे” देखील संजय राऊत यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
