Share

देशी दारुचा टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी; चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : चालकाचा ताबा सुटल्याने देशी दारुने भरलेला टेम्पो विद्युत खांबावर आदळल्याने टेम्पोला आग लागली. या आगीत संपुर्ण वाहनासह देशी दारू जळून खाक झाली आहे. जिल्ह्यातील पिशोरजवळील डोंगरगाव शेलाटी फाट्यानजीक नाचनवेल रस्त्यावर ही रविवारी दुपारी घटना घडली.

भराडी व चिंचोली येथील दुकानासाठी एक टेम्पो देशी दारु भरुन रविवारी बाबरा-नाचनवेल रस्त्यावरून जात होता. या रस्त्यावर चालक गणेश कदम याचा डोंगरगाव-शेलाटी फाट्याजवळ असलेल्या वळणावर टेम्पोवरील ताबा सुटला. ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या बाजूला विद्युतपुरवठा करणाऱ्या खांबावर जाऊन आदळला. या धडकेने खांबावरील काही तारा तुटून टेम्पोवर पडल्याने खोक्यातील काही बाटल्या फुटल्या. विद्यूत तार पडल्याने काही वेळातच दारूने पेट घेतला. प्रसंगावधान दाखवत चालक कदम याने तत्काळ वाहनातून उडी घेतल्यामुळे जीवितहानी टळली. पण लागलेल्या आगीत काही वेळातच संपूर्ण वाहन व दारूसह राख झाले.

सदर घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी सहायक उपनिरीक्षक माधव जरारे, चालक सरवर पठाण यांच्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. देशी दारू पुरवठादार नरेंद्र जैस्वाल हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. या आगीत सुमारे दहा लाखांची देशी दारू तसेच टेम्पो असे सुमारे तेरा लाख रुपयांचा मुद्देमालाचे नुकसान झाले, असे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी सांगितले. पिशोर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!