Share

‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये अजय देवगणची एंट्री

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘गंगूबाई कठियावाडी’ चा नुकताच टिझर लॉन्च झाला आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या टिझरवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे. आलिया भट्टचा या चित्रपटातील अभिनय चाहत्यांना फार आवडल्याचं दिसत आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षक किती प्रतिसाद देणार हे पाहण्याजोगे ठरेल.

https://www.instagram.com/tv/CLrBD0mAgTg/?utm_source=ig_web_copy_link

याच दरम्यान ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासंबंधीत एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटात आता अजय देवगणने धमाकेदार एंट्री केली आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी अजय देवगणने तब्बल 22 वर्षांनंतर संजय लीला भंसालीसोबत हात मिळविला आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये अजय देवगण हा मुंबईतील कुप्रसिद्ध डॉन करीम लालाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

अजय देवगन 10 दिवसांमध्येच भंसालीसोबत चित्रपटातील शूटिंग पूर्ण करणार आहे. यापूर्वी अजय देवगणने संजय लीला भंसालीसोबत ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट 1999मध्ये प्रदर्शित झाला होता. यात अजयसह सलमान खान आणि ऐश्‍वर्या राय यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!