औरंगाबाद: गोष्ट तशी फार छोटी मात्र तितकीच आशादायी. औरंगाबाद शहरातील अंमलदार विनोद बावस्कर यांचा एक फोटो कालपासून शहरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. औरंगपुरा येथे नाकाबंदी दरम्यान एका अंध तरुणाला त्याच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी तरुण पोलीस अंमलदार बावस्कर यांनी रस्ता क्रॉस करायला मदत केली. तसे पाहायला गेले तर अगदीच छोटी गोष्ट, वर्दीतली माणुसकी, खाकीतली माणुसकी असे कॅप्शन अनेक जण देतील मात्र अशा प्रकारची कृती प्रत्येकाकडूनच होईल असे नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे रात्री संचारबंदी सुरू होण्याच्या आधी अनेकांची कार्यालयातून निघण्यासाठीची लगबग सुरू असते. दोन दिवसांपूर्वी औरंगपुरा येथे दिव्यांग तरुण जात असतांना ड्युटीवर असलेल्या पोलीस अंमलदाराने या तरुणाला मदत केली. दिव्यांग तरुणाचा हात धरत पोलिसाने त्याला रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत देऊ केली. आणि हाच फोटो कोणीतरी काढत सोशल माध्यमावर शेअर केला.
त्यानंतर मोठ्या प्रमाणात हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. म्हटले तर ही गोष्ट छोटी आहे. मात्र रस्त्यावरून जातांना आपल्याला अनेकदा अपंग, दिव्यांग तसेच जेष्ठ दिसतात मात्र प्रत्येक जण त्यांना मदतीचा हात देऊ करतोच असे नाही. त्यासाठी असावे लागते संवेदनशील मन आणि एक संवेदनशील व्यक्ती. क्रांती चौक पोलीस स्टेशनचे पीआय गणपत दराडे यांनीही आपल्या ठाण्यातील या अंमलदाराचा फोटो शेअर करत त्याच्या या माणुसकीने ओथंबून भरलेल्या कृतीचे कौतुक केले.
महत्त्वाच्या बातम्या
-
“उत्पल पर्रीकरांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास आमचा पाठींबा”,संजय राऊतांचा मोठा दावा
-
राज्यात महाविकासआघाडीने केला भाजपचा सुपडा साफ; रोहित पवारांची रोखठोक पोस्ट
-
धक्कादायक! साताऱ्यात माजी सरपंचाने केली गरोदर वनरक्षक महिलेला मारहाण
-
“आमचा सातारचा वाघ घरी बसनार्यातला नाय…”, किरण मानेंची ‘या’ चित्रपटात लागली वर्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
