Share

मविआ सरकारचे स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्याच हातात- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे आज(११ फेब्रु.)पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात दौऱ्यावर होते. आदित्य यांच्यासह मतदारसंघाची पाहणी केल्यानंतर दोन्ही नेते दादरमध्ये (Dadar) चैत्यभूमीजवळ पाहणी करण्यासाठी गेले होते. तद्पश्चात विरोधी पक्षांकडून अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी विरोधकांना उत्तर दिले असून आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्या एकत्र पाहणीनं भाजपला पोटदुखी झाल्याचे ते म्हणाले आहेत.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्या एकत्र पाहणीनं भाजपला पोटदुखी झाली आहे.’ तसेच धमक्या दहशदीचं राजकारण करून महाविकास आघाडी सरकारला तडा जात नाही आणि कधी जाणारही नाही. या सरकारचं स्टेअरिंग हे ठाकरेंच्याच हातात आहे आणि राहील, असेही राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान, यासंबंधी अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की,‘एकत्र पाहणीचा अर्थ युती असा होत नाही. तसेच प्रत्येकाला आपआपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. परंतु निवडणुकीतील युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होईल’, असे यावेळी अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!