🕒 1 min read
पुणे – एसटी बसमध्ये आसन, हॅन्ड रेस्ट, गार्ड रेल, रेलिंग, दरवाजा हे प्रवाश्यांद्वारे वारंवार स्पर्श केले जातात ज्यामुळे कोरोना आणि इतर बॅक्टिरीया आणि व्हायरसचा प्रसार होतो त्यामुळे इतर प्रवाशांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. हा धोका टाळण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसला अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणे करून कोरोना आणि इतर व्हायरसचा प्रसार रोखता येईल.
अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग मुळे कोरोना व्हायरस, विषाणू, बुरशी आणि इतर जीवाणूंपासून पुरेसं आणि दीर्घकाळ संरक्षण मिळतं.आत्तापर्यंत राज्यभरात आठ हजार गाड्यांचे कोटींग पूर्ण झाले आहे. साध्या गाड्यांसहीत निमआराम आणि वातानूकूलित गाड्यांचाही त्यामध्ये समावेश आहे. 10 हजार बसेससाठी कोटींगचे उदिष्ट्य ठेवले असल्याची माहिती एसटीचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली.
दरम्यान, राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 3 हजार 198 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची एकंदर संख्या 63 लाख 71 हजार 728 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर 97.27 टक्के आहे.राज्यात काल कोरोनाच्या 3 हजार 63 नव्या रुग्णांची भर पडली तर कोविड-19 मुळे 56 रुग्णांचा मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्या यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणे गरजेचे नाही – जयंत पाटील
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- RBI चा मोठा निर्णय; १ ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंटमध्ये बदल
- आयपीएलमध्ये फक्त पन्नास रुपये गुंतवून सलूनवाला रातोरात झाला करोडपती


