🕒 1 min read
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ऑटो डेबिट पेमेंट सिस्टममध्ये मोठे बदल होणार असून याबाबतचे नवे गाईडलाईन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे बदल आज पासून म्हणजे १ ऑक्टोबरपासून वीजबिल, मोबाईल बिल अथवा इतर खर्चांचं पेमेंट बँकेत ऑटो डेबिट मोडवर टाकलं असेल, तर आता तुमच्या परवनगीविना बँक खात्यातून पैसे कट होणार नाही. यासाठी आधी बँकेला तुमची परवानगी घ्यावी लागणार आहे.
अनेक नागरिक मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे वीज, गॅस, एलआयसीचा हप्ता, इतर ईएमआय दर महिन्याला भरता, ते अनेकदा ऑटो मोडवर टाकले जाते. यामुळे बिल आलं की बँक खात्यातून त्याची रक्कम आपोआप कापली जाते. परंतु अनेकदा बिलं जास्त येतात किंवा घेतलेल्या सुविधेचे पैसे लावलेले जातात याचे देखील पैसे यातून कट होतात. त्यामुळे नागरिकांचे यामध्ये नुकसान होते. यासाठी आता ग्राहकांच्या परवानगी शिवाय पैसे कट करता येणार नाही.
जर हे बिल 5 हजारांच्या खाली असतील तर ते ट्रान्झक्शन कॅन्सल केले जातील, 5 हजारांच्या वरील बिल असेल तर तुम्हाला ती रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करावी लागेल. यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्डचा वापर करु शकता. देशात डिजिटल पेमेंटला जास्त सुरक्षित बनवण्यासाठी Additional Factor Authentication (AFA) लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. RBI नं ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे.
RBI नियमानुसार, बँका पेमेंटच्या तारखांपूर्वी ५ दिवस आधी ग्राहकांना नोटिफिकेशन पाठवतील. पेमेंट मंजुरी तेव्हाच मिळेल जेव्हा ग्राहक त्यासाठी परवानगी देईल. जर रिकरिंग पेमेंट ५ हजारपेक्षा अधिक असेल तर बँक ग्राहकांना एक वन टाइम पासवर्ड पाठवतील. RBI नं ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात आनंदराव अडसुळ यांची हायकोर्टात धाव
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- तुम्ही दिल्लीचा गळा दाबला, शहरात येण्याची परवानगी मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांनाच फटकारलं
- नवऱ्याने मारहान करणे याला कौटुंबिक हिंसाचार म्हणतात हेच महिलांना माहित नाही; चित्रा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

