मुंबई: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस देखील पाऊस काही भागात सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या पाच दिवसाच पुन्हा एकदा राज्यातील विविध क्षेत्रात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे औरंगाबादसह परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूरातील अनेक धरणं दुथडी भरून वाहत आहेत. मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांचे नुकसान झाले.
तर, काही ठिकाणी पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. भारतीय हवामान खात्याने आज मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
संबंधित जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस जालना येथे सरासरीपेक्षा 69 टक्के अधिक आहे. आजपासून पुढील चार दिवस विदर्भात हळुहळू पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पावसाचा जोर वाढणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे व शेतकऱ्यांच्या जमीनींचे तात्काळ पंचनामे करा – जयंत पाटील
- कमालच ! सिंधुदुर्ग विमानतळ सुरु होण्याआधीच ‘या’ तारखेपर्यंतच तिकीट फुल्ल
- ‘परवा एका एकराला 18 कोटी दिले; आता लोकं भेटून सांगतात, दादा रस्ता तेवढा आमच्या शेतातून न्या’
- ‘…मग हे कसले घंट्याचे बेस्ट CM ?’ निलेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर विखारी टीका
- ओशो आश्रमातील गैरकारभाराची सरकारने चौकशी करावी; ओशो अनुयायांची आठवलेंकडे मागणी


