Share

खंडपीठाच्या आदेशानंतरही राज्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केली नाही- खासदार इम्तियाज जलील

Published On: 

औरंगाबाद : कोरोना सारख्या महामारीच्या काळातदेखील राज्य सरकारच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी उदासिनता दाखवण्यात येत आहे. या संबधी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने तत्काळ भरती करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. मात्र, खंडपीठाच्या आदेशानंतरही राज्य सरकारने भरती प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

या संबंधी सुनावणी दरम्यान न्यायालयाने ७ मे रोजी राज्य सरकारला आदेश दिले होते. यामध्ये १५ दिवसात प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशीत करण्यात आले होते. मात्र, या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान १४ जून रोजीही राज्य सरकार केवळ शपथपत्र दाखल करुन वेळ काढू पणा करत असल्याचे दिसून आले आहे.

कोरोना सारख्या संकटाच्या काळातही राज्य सरकार आरोग्य कर्मचारी भरती करण्यासाठी गंभीर नसल्याबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षी देखील न्यायालयाने आरोग्य कर्मचारी भरती संदर्भात आदेश दिले होते. मात्र, अद्यापही राज्य सरकारने भरती केलेली नसल्याचा आरोपही खासदार जलील यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!