🕒 1 min read
मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा करुणा मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या उमेदवारी अर्ज भरण्याअगोदर करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असतांना त्यांनी हे वक्तव्य केले. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.
“इतका आदर्श सामाजिक न्याय मंत्री आजवर राज्याला लाभला नाही.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे. दरम्यान करुणा मुंडे यांच्या या दाव्यानंतर राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिक्रिया उमटत असून भाजपने यावरून थेट मविआ सरकारला निशाण्यावर धरले आहे.
इतका आदर्श सामाजिक न्याय मंत्री आजवर राज्याला लाभला नाही. pic.twitter.com/x9QXMfyVxk
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 24, 2022
दरम्यान मविआ सरकारमधील होणाऱ्या कारवाया, ईडी धाडी तसेच त्यांच्यावर होणारे आरोप-प्रत्यारोप यावरून कुठेतरी तीन चाकी सरकार डगमगत असल्याचे म्हटले जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यातील नेत्यांवर आणि त्यांच्या आप्तेष्टांवर धाडी टाकल्या आहेत. हे चक्रसत्र आता थेट मातोश्रीपर्यंत पोहोचले आहे. ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर धाड टाकली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले असतानाच करुणा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांनी वातावरण अजूनच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वीर सावरकर’ यांच्या बायोपिकमध्ये रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत
- दिपाली सय्यद यांची मोठी घोषणा! महिला कुस्तीगिरांनाही मिळणार महाराष्ट्र केसरी होण्याचा मान
- PAK vs AUS: असे काय झाले की शाहीन वॉर्नरचे फोटो होताय व्हायरल; VIDEO पाहाच!
- “सत्तेच्या माध्यमातून टोल कलेक्शन”- जयदत्त क्षीरसागर
- “मनोहर जोशींना एक न्याय तर ठाकरेंना दुसरा न्याय का?”- नितेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
