🕒 1 min read
मुंबई: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम कसोटीच्या ३ रा दिवस खूप चर्चेचा ठरला आहे. याचे कारण आहे वॉर्नर आणि शाहीनचे आमने सामने येणे. या दोघांचे एकमेकांसमोर उभे असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हरल झाले आहेत. यावर अनेक मजेशीर मिम आणि टिप्पण्या केल्या जात आहेत.
झाले असे की, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात चार विकेट घेणारा शाहीन (shaheen afridi) दुसऱ्या डावात विकेट मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होता. त्याने एक शॉर्ट बॉल टाकला, ज्याचा वॉर्नरने आरामात बचाव केला. पण चेंडू वॉर्नरच्या (david warner) पाया जवळ आदळला. शाहीनने संधी बघून वॉर्नरच्या दिशेने धाव घेतली आणि वॉर्नरही शाहिनच्या समोर आला. दोघांनी एकमेकांकडे टक लावून पाहिले. त्यानंतर दोघेही हसताना दिसले. पीसीबीने संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलने या घटनेचा व्हिडिओ अपलोड केला आणि लगेचच क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
What a way to conclude the day ???? #BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/FafG8lkVTT
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 23, 2022
सामन्यातील या घटनेचे फोटो बाहेर येताच क्रिकेट रसिकांनी यावर अनेक मिम्स देखील बनवले आहेत. वॉर्नरने देखील त्याचा इंस्टाग्रामवर या घटनेचा फोटो टाकला आणि त्यानंतर शाहीन सोबतचा एक सेल्फी देखील शेअर केला आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या सातत्यपूर्ण वेगवान गोलंदाजी आणि मिचेल स्टार्कच्या अभेद्य रिव्हर्स स्विंगच्या जोरावर पाकिस्तानने २६८ धावांची आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- …ते हेच करत राहणार, आपण लढत राहायचे- उद्धव ठाकरे
- “फुसक्या बारची फॅक्टरी घरातच असल्यामुळे…”, निलेश राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका
- आवेश खानने केले पंतच्या नेतृत्वाचे कौतुक; सांगितला ‘त्या’ लाईफ चेंजिंग सामन्याचा किस्सा
- “राजस्थान, छत्तीसगडप्रमाणेच महाष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करा”, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- बंडातात्या कराडकरांचे महात्मा गांधीं संदर्भात वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
