Share

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वीर सावरकर’ यांच्या बायोपिकमध्ये रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट (बायोपिक) बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. सावरकरांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहेत. तर या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची भूमिका साकारणार आहे.

ज्या कामामध्ये जीव ओतावा लागतो असं कामच स्वीकारावं अशी भूमिका या चित्रपटासंदर्भात बोलताना रणदीपने मांडलीय. रणदीपचं सध्या नेटफ्लिक्सवरील ‘एक्स्ट्रॉर्शन’ या चित्रपटासाठी कौतुक होताना दिसतंय. विशेष म्हणजे आता रणदीप सावकरांची भूमिका साकारणार असून या चित्रपटाची निर्मितीही ‘सरबजीत’ चित्रपटाचे निर्मातेच करणार आहे. या चित्रपटामधील सावरकरांच्या भूमिकेसाठी शरीरयष्टी आणि सर्वच बाबतीत रणदीप अगदी उत्तम आहे, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.

“सध्या त्या कथा सांगण्याची उत्तम वेळ आहे ज्यांच्याकडे यापूर्वी आपण कानाडोळा केला होता. वीर सावरकरांच्या आयुष्यावरील चित्रपटाची कथा ही एक उत्साहाने भरलेली कथा असेल. आपण आपला इतिहास पुन्हा पहावा यासाठी ही कथा प्रेरणादायी ठरेल,” असं महेश मांजरेकर यांनी म्हटलंय. “आम्ही या चित्रपटावर काम सुरु केलंय हे सांगताना मला फार आनंद होतोय. चित्रपटाच्या पटकथेचं काम जवळवजळ पूर्ण होत आलंय. लवकरच या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे,” असं महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केलंय.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचं चित्रिकरण याच वर्षी जून महिन्यामध्ये सुरु होणार आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार बेटांवर होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!