Share

मराठा आरक्षणाबाबत अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार अपप्रचार करतंय : देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यांपैकी एक असलेल्या मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. आज पहिल्या दिवशीच्या सुनावणीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आली असून १५ मार्चपासून पुन्हा सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर इतरही राज्यांना पक्षकार बनवावे आणि त्यांना तशी नोटीस पाठवावी अशी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती. राज्य सरकारची ही विनंती आता मान्य करण्यात आली असून आरक्षणाच्या प्रश्नावर आता सर्व राज्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. आरक्षणाच्या या प्रश्नावर इतर राज्यांनी सहभाग दाखवला तर केंद्र सरकारला यावर हस्तक्षेप करावा लागेल आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपलं मत सर्वोच्च न्यायालयात मांडावं लागणार आहे.

यावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ‘इतर राज्यांना नोटीस बजावण्याच्या राज्य सरकारच्या मागणीला केंद्र सरकारने न्यायालयात पाठिंबाच दिला. मुळात 102व्या घटनादुरूस्तीचा मुद्दा हा उच्च न्यायालयातच निकाली निघाला आहे. महाराष्ट्राचा मराठा आरक्षण कायदा वैध ठरविताना हा कायदा घटनादुरूस्तीच्या आधीचा असल्याने त्याला ही घटनादुरूस्ती लागू होणार नाही, असे उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात स्पष्ट केले आहे. मग आज हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित करण्याची गरज काय? त्यामुळे केवळ आपले अपयश झाकण्यासाठी अपप्रचार करण्यात अजिबात अर्थ नाही,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!