Share

‘राज्यातील ‘या’ सहकारी बँकेला रिझर्व बँकेकडून मिळाले बक्षीस

Published On: 

🕒 1 min read

जालना: राज्यातील सरकारी बँकांप्रमाणेच सहकारी बँकांची व्याप्ती देखील मोठी आहे. त्यामुळे सहकारी बँकांची आर्थिक उलाढाल ही राज्यात नेहमीच मोठी राहिलेली आहे. तर आता सर्वच क्षेत्र आद्यायावत आणि संगणकीकृत होत असताना सहकारी बँका देखील अद्ययावत प्रणालींच्या वापरात अग्रगण्य ठरत आहेत.

राज्यातील बँकांना रिझर्व बँकेकडून प्रोत्साहन म्हणून बक्षिसे दिली जातात. यामध्ये ग्राहक जोडणे आणि कर्ज वितरण याचा समावेश असतो. असेच राज्यातील जालना जिल्ह्यातील प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेला विशेष ३४ लाख रुपयांचे बक्षीस रिझर्व बँकेकडून देण्यात आले आहे.

प्रियदर्शनी बँकेने जालना शहर आणि जिल्ह्यातील किमान सव्वा लाख ग्राहक मोबाइल अ;ॅपशी जोडलेले आहेत. या माध्यमातून अगदी लहान-मोठ्या, मध्यम अशा सर्वच स्तरातील गरजूंना कमी रकमेचे कर्ज वाटप करण्यात आले. तसेच, सामान्य लोकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

या कामगिरीची दखल गेत, रिझर्व्ह बँकेने प्रायोरिटी सेक्टर सर्टिफिकेट (पीएसएलसी) अंतर्गत बँकेस ३४ लाख रुपये बक्षीस म्हणून दिले आहेत. बँकींग क्षेत्रात उत्कृष्ट बँक म्हणून या बँकेला पूर्वीच राज्य शासनाने पारितोषिक देऊन सन्मानीत केलेले असून बँकेच्या अन्य सर्व कामकाजाबद्दलही विविध पुरस्कार बँकेला मिळालेले आहेत.

प्रियदर्शनी बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अ;ॅड. विलास खरात यांच्यासह चेअरमन नितीन तोतला,तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप गर्जे पाटील आणि विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन वाणी यांनी कल्पकतेतून बँकेची वाटचाल सुरू ठेवली आहे. विलास खरात यांच्या हस्ते सचिन वाणी व सर्व बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!