🕒 1 min read
मुंबई : सर्वांचा लाडका बाप्पा अवघ्या काही तासांच्या प्रतिक्षेनंतर घरोघरी विराजमान होणार आहे. गणेशोस्तवाचे औचित्य साधत बॉलिवूडचा अभिनेता सलमानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ मधील ‘विघ्नहर्ता’ हे गाणं प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं आहे.
विघ्नहर्ताचे आशीर्वाद घेत हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आले असून या गाण्यात वरुण धवणने पाहूणा कलाकार म्हणून हजेरी लावली आहे. सलमानच्या चित्रपटातील पहिलं गाणं हे विघ्नहर्ता आहे. गणपती उत्सवाचे सार आपल्याला या गाण्यात पाहायला मिळत आहे.
सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे गाणं शेअर केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘अंतिम’ची सुरुवात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने’ असे कॅप्शन सलमानने दिले आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ मध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्सने केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. सोशल मीडियावर याबद्दल जोरदार चर्चा देखील रंगत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी कडक निर्बंध लावावेच लागतील’, मंत्री नितीन राऊतांचा इशारा
- ‘शहराचे हित जोपासले गेले नाही तरी चालेल पण स्वत:चे आर्थिक हित जोपासले गेले पाहिजे हाच भाजपचा उद्देश’
- ‘मोदींनी चार प्रमुख सुधारणा केल्यास नवीन कृषी कायदे मान्य’, भारतीय किसान संघाची भूमिका
- बारामतीच्या काका-पुतण्यावर किरीट सोमय्या यांचा पुण्यात हल्लाबोल
- ‘..मग नारायण राणे महायेडे होते का?’, गुलाबराव पाटलांचा नितेश राणेंना खोचक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
