मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून वाद सुरू आहे. त्यातच सिंधुदुर्गातील राणे समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. देवगडच्या दोन नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधल्यामुळे राणेंना हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी करत शिवसेनेवर पलटवार करत ‘येड्यांची जत्रा’ अशी उपमा दिली होती.
यावरून शिवसेनेचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नितेश राणेंवर पलटवार केला आहे. ‘शिवसेना येड्याची आहे म्हणणारे नितेश राणे यांनी हे लक्षात घ्यावे या जत्रेत नारायण राणे देखील होते, मग ते महायेडे होते का? असा खोचक सवाल पाटील यांनी विचारला आहे.
मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत भाजप आणि नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले. काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करत असताना शिवसेनाही येड्याची जत्रा आहे, असा टोला लगावला होता. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘शिवसेना येड्याची आहे म्हणणारे नितेश राणे यांनी हे लक्षात घ्यावे, या जत्रेत नारायण राणे देखील होते, राणे हे सेनेत मोठे झाले, मग ते महायेडे होते का? असा सवालच पाटील यांनी विचारला.
तसेच ‘किरीट सोमय्या हे अतिहुशार आहेत. धमकी येत असेल तर ते कधी पोलीस स्टेशनला जात नाही. ते थेट मीडियाकडे जातात आणि आपल्याला धमकी आल्याचं सांगता. ते पोलिसांकडे न जाता मीडियासमोर का जातात? असा सवाल उपस्थितीत करत गुलाबराव पाटील यांनी सोमय्यांना टोला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यातील शाळांच्या विकासासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्र्यांची माहिती
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- ‘नीलम गोऱ्हे राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार होत असताना आता कोठे आहेत ?


