पुणे : भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी त्यांनी आज पत्रकार परिषेद देखील घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवारांपासून सुरुवात करायची की शरद पवारांपासून या संभ्रमात असल्याचा खोचक टिप्पणीही देखील त्यांनी यावेळी केली आहे.
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर ७२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. तर खासदार शरद पवार यांनी भावना गवळींना ईडीकडून विनाकारण त्रास देण्यात येत आहे, असा आरोप करून त्यांचे समर्थन केले होते. यावर किरीट सोमय्या यांनी शरद पवार यांनी भावना गवळींना विचारावे की, कपाटातून जे सात कोटी चोरीला गेले ते कुठून आले होते? असा टोला लगावला होता.
शरद पवार भावना गवळी यांचे समर्थन करत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे ४४ कोटी रुपये केंद्र सरकारचे आणि ११ कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाचे, असा ५५ कोटींचा कारखाना त्यांनी बुडवला. तो कारखाना २५ लाखांत भावना गवळी कंपनीने विकत घेतला. शरद पवार यांनी याची चौकशी केली का? असा सवालही किरीट सोमय्या यांनी केला.
तर अजित पवार यांना किरीट सोमय्या यांनी खुले आव्हान दिले आहे. अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्युएशनचे कागद लोकांसमोर का ठेवत नाहीत? 65 कोटी रुपयांत कारखाना घेतला आणि 700 कोटी रुपयांचं कर्ज घेतले आहे. वैभव शिदे असं एका व्हॅल्युअरचं नाव आहे. शरद पवार यांना यासाठीच सहकार चळवळ हवी आहे का? असा सवालही सोमय्या यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कर्जबाजारी झालेल्या अनिल अंबानींना सुप्रीम कोर्टाचा ; मिळणार तब्बल ४,६५० कोटी रुपये
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- ‘नीलम गोऱ्हे राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार होत असताना आता कोठे आहेत ?


