मुंबई : देशाच्या राजधानीत घडत असलेल्या आंदोलनावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. आंदोलनामुळे चिघळलेल्या परिस्थितीवरून आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शेतकरी नेते अशोक ढवळे यांनी शेतकऱ्यांनी हिंसा केलेली नाही, जी काही हिंसा झाली ती पोलिसांनी केली आहे. ती सुद्धा भाजपाच्या सरकारच्या सांगण्यावरुन झालेली आहे, असा आरोप केला आहे.
आता या प्रकरणावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे. ‘बाबरी मशीद पडली तेव्हाही गुप्तचर यंत्रणेचं अपयश होतं आणि आज शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं हे सुद्धा गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे. आजचा दिवस हा आणीबाणी सारखाच आहे.’ अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बोट दाखवलं असलं तरी शहा यांचा राजीनामा मागितला नसल्याची सारवासारवही त्यांनी केली आहे.
राजधानी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी शांततेत आंदोलन करत होते. पण दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला. त्यांनी उग्र आंदोलन केलं. याला जबाबदार कोण आहे? दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा का नाही काढला? चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवण्याचं कारण काय होतं? असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.
महत्वाच्या बातम्य
- ‘दिल्लीतील परिस्थितीला जबाबदार धरून आता अमेरिकेच्या जो बायडन यांचा राजीनामा घेणार का ?’
- ‘मोदींच्या द्वेषापोटी काँग्रेस शेतकऱ्यांच्या आडून हिंसाचार घडवत आहे’
- ‘दिल्लीत पोलिसांनीच हिंसा केली, ती सुद्धा भाजपाच्या सरकारच्या सांगण्यावरुन !’
- ‘मोदी सरकारची दादागिरी, मस्ती खपवून घेणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं’
- दिल्लीतील चिघळलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गृहमंत्रालयाने उचलले महत्वाचे पाऊल !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

