Share

‘दिल्लीतील परिस्थितीला जबाबदार धरून आता अमेरिकेच्या जो बायडन यांचा राजीनामा घेणार का ?’

Published On: 

मुंबई : दिल्लीमध्ये आज प्रजासत्ताक दिनी गालबोट लागल्याचं दिसून येत आहे. शेतकरी आंदोलनाला दोन महिने उलटून देखील आंदोलन सुरूच आहे. तर, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करून ट्रॅक्टर रॅली काढली. पोलिसांनी परवानगी दिलेला मार्ग सोडून शेतकऱ्यांनी दिल्लीतील इतर भागात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस व शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाला.

शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन लाल किल्ल्यावर धावा चढवला. तर, अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्लाबोल करत ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न देखील केलेला दिसून आलं. शेतकरी नेत्यांच्या तसेच पोलिसांच्या देखील हाताबाहेर परिस्थिती गेल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अश्रूधूर, लाठीचार्ज देखील सुरु केला. तर, शेवटी नेत्यांनी आंदोलकांना माघारी मुख्य आंदोलन स्थळी परतण्याचं आवाहन केलं. मात्र, अजूनही आंदोलक पोलीस गाड्यांसह इतर मालमत्तेचं नुकसान करताना दिसत आहेत.

यावर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ‘आजची घटना ही राष्ट्रीय शरमेची ही बाब आहे. आज प्रजासत्ताक दिवस आहे. पूर्ण देश, पूर्ण विश्व आपल्या शक्तीचं, ताकदीचा अनुभव घेत असतं. राजपथावर आमच्या सैन्याचं सामर्थ्य दिसतं. मात्र आज दिल्लीच्या रस्त्यावर आज जे चित्र दिसलं ते ना आंदोलकांना शोभा देतं, ना सरकारला. दोन महिन्यापासून शांततेने आंदोलन सुरु होतं. जगभरात त्याचं कौतुक होतं. शेतकऱ्यांचं इतकं शिस्तबद्ध आंदोलन जगात कुठे झालं नाही. आज अचानक काय झालं ?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

‘शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला. त्यांनी थेट लाल किल्ल्यावर कूच केली. सरकार काय करत होतं? सरकार याच दिवसाची वाट पाहात होतं का? शेतकऱ्यांचा संयमाचा बांध तुटणार होता, तर ती सरकारचीही जबाबदारी होती. आजची ट्रॅक्टर रॅली रोखून शेतकऱ्यांना नीट घरी जाऊ दिलं असतं’, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे..

‘शेतकऱ्यांचा संयम तुटत असताना सरकारची काही जबाबदारी नव्हती का? कायदा नेमका कुणासाठी, शेतकऱ्यांचं ऐकलं जात नसेल तर तो कायदा कुणासाठी झालाय? दिल्लीच्या रस्त्यावर आज अराजकता निर्माण झाली आहे. पंजाब अशांत व्हावा, पंजाबच्या लोकांना खलिस्तानी ठरवून अराजकता निर्माण करावी हे षडयंत्र आहे का? आज हे घडायला नको होतं. सरकारने या गोष्टीची जबाबदारी घ्यायला हवी’, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

‘या ठिकाणी दुसरा पक्ष असता किंवा इतर कोणत्या राज्यात हा प्रकार घडला असता तर राजीनामा मागितला गेला असता. आज जी घटना घडली त्याबद्दल कुणाचा राजीनामा मागणार? सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवारांचा राजीनामा मागणार की जो बायडनचा राजीनामा घेणार ?,’ अशी उपहासात्मक टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्य

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!