Share

‘मोदी सरकारची दादागिरी, मस्ती खपवून घेणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं’

Published On: 

मुंबई : दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देखील हे आंदोलन सुरु असून आज शेतकऱ्यांनी दिल्लीतील सीमांमधून आत येऊन ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे.

या आंदोलनासाठी पोलिसांनी मार्ग आखून देऊन मर्यादित परवानगी दिली होती. राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर या आंदोलनाला वेळ देण्यात आली होती. याआधीच हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला तीन सीमांमधून दिल्लीत प्रवेश करून हा ट्रॅक्टर मोर्चा पुढे चाललेला होता. मात्र शेतकरी अधिक आक्रमक झाले व हा जत्था लाल किल्याकडे जात असताना पोलीस व आंदोलक भिडल्याचं दिसून आलं.

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी देखील प्रतिक्रिया देताना या हिंसाचाराचं खापर मोदी सरकारवर फोडलं आहे. ‘शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात सुमारे १२ हुन अधिक चर्चेच्या फेऱ्या झाल्या मात्र समस्या सुटली नाही. दोन महिन्यांहून अधिक काळ हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. त्यामुळे त्यांचा आता संयमाचा बांध फुटला आहे. आता मोदी सरकारची दादागिरी, मस्ती खपवून घेणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. शेतकऱ्याच्या विरोधात जर गेलात तर तुम्हाला नेस्तनाबुत केल्याशिवाय राहणार नाही,’ असा आक्रमक इशारा देखील बाळू धानोरकर यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

दरम्यान, हे आंदोलन आता शेतकरी नेत्यांच्या हाताबाहेर गेल्याचं दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी लाल किल्ला देखील काबीज केल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता काही आंदोलकांनी दगडफेक केली, ट्रॅक्टर पोलिसांवर चढवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आखून दिलेला मार्ग सोडून हे आंदोलक इतर भागात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस अश्रूधूर, लाठीचार्ज करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

महत्वाच्या बातम्य

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!