मुंबई : दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देखील हे आंदोलन सुरु असून आज शेतकऱ्यांनी दिल्लीतील सीमांमधून आत येऊन ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे.
या आंदोलनासाठी पोलिसांनी मार्ग आखून देऊन मर्यादित परवानगी दिली होती. राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर या आंदोलनाला वेळ देण्यात आली होती. याआधीच हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला तीन सीमांमधून दिल्लीत प्रवेश करून हा ट्रॅक्टर मोर्चा पुढे चाललेला होता. मात्र शेतकरी अधिक आक्रमक झाले व हा जत्था लाल किल्याकडे जात असताना पोलीस व आंदोलक भिडल्याचं दिसून आलं.
हे आंदोलन आता शेतकरी नेत्यांच्या हाताबाहेर गेल्याचं दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी लाल किल्ला देखील काबीज केल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता काही आंदोलकांनी दगडफेक केली, ट्रॅक्टर पोलिसांवर चढवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आखून दिलेला मार्ग सोडून हे आंदोलक इतर भागात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस अश्रूधूर, लाठीचार्ज करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
या सर्व प्रकारावर काँग्रेस नेते व प्रवक्ते केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शेतकरी असं कृत्य कधीही करणार नाही. शेतकऱ्यांच्या हातून असं घडणार नाही. भ्रमित करुन त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. शेतकरी हिताचा विचार काँग्रेसच्या मनात कधीच नव्हता. देशात आणि राज्यात काँग्रेसच सरकार होते मात्र मोदींच्या द्वेषापोटी शेतकऱ्यांच्या आडून हे सर्व चाललंय’ असे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्य
- हिंसाचाराने ही समस्या सुटणार नाही, नुकसान देशाचंच होईल; राहुल गांधींचं शेतकऱ्यांना आवाहन
- दिल्ली : आंदोलकांचा पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न
- शेतकरी आंदोलन चिघळले; पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकर्त्यांनी उपसल्या तलवारी!
- ‘मोदी सरकारची दादागिरी, मस्ती खपवून घेणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं’
- तुमचे जुने वाहन प्रदूषण करणारे आहे ? भरावा लागू शकतो ‘हा’ कर !


