मुंबई: भाजप नेते नितेश राणे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अणुशक्तीनगर विधानसभा वॉर्डमध्ये कार्यकर्ते संमेलन आयोजित करण्यात आला होते. यावेळी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर निशाणा साधला.
नितेश राणे यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून ठाकरे सरकारवर टीका करत म्हटले की, “दाऊदशी संबंध असल्यामुळे भाजप नवाब मलिकांचा राजीनामा मागत आहे. त्यांचे मंत्रीपद अजूनही कायम आहे. त्यांना पाठीशी घालत आहात, तर मग मुलांना रस्त्यावर काय सुरक्षा द्याल.” असा सवाल करत खरे म्हटले तर आपण काही जण हिंदुह्रदयसम्राट असल्याचे बॅनरसहित फोटो लावता. पण तुम्ही माझ्या भावना विचारली, तर ‘हिंदुहृदयसम्राट’ ही पदवी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यानंतर जर कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना द्यायला हवी, कारण त्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच दाऊद कनेक्शन समोर आले आहे. असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पोस्टर्स लावून त्यावर हिंदुहृदयसम्राट असे लिहिले असल्याचे अनेकदा दिसले आहे. तर दुसरीकडे नितेश राणे यांनी फडणवीसांना थेट ही पदवी दिल्याने आता सेना-भाजप वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- थायलँड पोलिसांकडून नवीन खुलासा; शेन वॉर्नच्या रूममध्ये रक्ताचे डाग आढळले
- “मैदानावरची स्पर्धा मैदानाबाहेर नसते”, जितेंद्र आव्हाडांनी केले भारतीय महिला क्रिकेटर्सचे कौतुक
- वाटले नव्हते की एवढ्या लवकर सामन्याचा निर्णय लागेल, श्रीलंकन दिग्गजाचे वक्तव्य
- “…पण तुम्हाला आजपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही”, पडळकरांचा खोचक टोला
- “चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही”, ‘त्या’ घटनेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

