🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना साथीच्या दुस-या टप्प्यात सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत सलुन, पार्लर व स्पा व्यावसायिकांना बंदी केल्याने त्यांच्या उपजिविकेवर गदा आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले असून या आंदोलनाचा पाचवा टप्पा गुरुवारी (दि.२२) वैजापुरात घेण्यात आला. त्याअंतर्गत लॉकडाऊनचे सर्व नियम पाळुन व कमीत कमी एकाने मुंडण करुन प्रत्येकाच्या घरासमोर शासनाचा फलक दाखवुन निषेध करण्यात आला.
या आधी नाभिक महामंडळातर्पेâ दि.५ एप्रिलपासुन पहिल्या टप्प्यात शासन निर्णयाची होळी, दुस-या टप्प्यात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, तिस-या टप्प्यात दुकानासमोर घंटानाद थाळीनाद व चौथ्या टप्प्यात फलक दाखवुन निषेध आंदोलन करण्यात आले होते.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणा-या नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. अन्य व्यावसायिकांना ठराविक वेळेत व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाते. मग याला सलुन व पार्लर व्यवसायाचा अपवाद का असा प्रश्न नाभिक महामंडळातर्पेâ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
याबाबत महामंडळाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अनर्थे, नाभिक कर्मचारी महासंघाचे तालुकाध्यक्ष रंजितसिंह मथुरिया, संजय वाघ, दिलीप विश्वासु, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जगताप, सनील विश्वासु, प्रवीण पंडित यांनी तहसिलदारांना निवेदन दिले. सलुन व्यावसायिकांना बंदी करण्यापुर्वी प्रतिमाह २० हजार रुपये खात्यात जमा करावेत, सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत व्यवसायास परवानगी द्यावी, लॉकडाऊनमुळे आत्महत्या केलेल्या नाभिक कुटुंबास तातडीने आर्थिक मदत करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपा का बाबा बंगाली!’ राष्ट्रवादी काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका !
- महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने कडक निर्बंध लावण्याची वेळ मात्र,अर्थचक्राला झळ बसू देणार नाही – मुख्यमंत्री
- ज्यादा भाडे दर आकारणार्या रुग्णवाहिकांवर परभणी आरटीओ कारवाई करणार
- राज्यात सतराशे साठ लोक वेगवेगळं बोलताहेत, ज्याने नुसता गोंधळ झालाय; ‘ई-पास’वरून चित्रा वाघ संतापल्या
- बीड येथे वाळू माफियांवर कारवाई; ५० ब्रास वाळूसह दोन बोटी जप्त

