Share

…म्हणून द. आफ्रिका दौऱ्यासाठी वनडे संघाची निवड पुढे ढकलली

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वनडे संघाची निवड पुढे ढकलण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाची निवड विजय हजारे ट्रॉफीनंतर लगेचच होणार होती मात्र, रोहित शर्माच्या फिटनेसमुळे ही निवड पुढे ढकलण्यात आली आहे. आता 30 किंवा 31 डिसेंबरला भारतीय संघाची घोषणा होऊ शकते.

एकदिवसीय आणि टी-20 कर्णधार रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी दुखापतग्रस्त झाल्याने कसोटी मालिकेतून बाहेर पडला आणि आता वन-डे मालिकेतही त्याच्या खेळण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. सध्या रोहित शर्मा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “संघ निवडीला थोडा विलंब झाला आहे. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलही उपलब्ध नसल्याचे सांगितले. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “संघ निवडीची बैठक 30 किंवा 31 डिसेंबरला होऊ शकते परंतु बीसीसीआयने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करत आहे.”

कसोटी संघाची घोषणा करताना रोहित शर्माला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्याची घोषणा करण्यात आली होती. विराट कोहलीच्या जागी रोहितकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. याशिवाय रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये उपकर्णधार करण्यात आले होते.

यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेसाठी फिट नसेल तर त्याच्या जागी केएल राहुलला कर्णधार बनवले जाऊ शकते. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आणि पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करताना शतकही झळकावले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!