Share

वाळू चोरणाऱ्या फटफटी गँगने पुन्हा डोकेवर काढले! पैठण शहरातील सर्वच वाळुपट्यातुन वाळुचोरी सुरु

Published On: 

औरंगाबाद : पैठण येथील गोदावरी पात्राची अक्षरशः चाळनी करणाऱ्या फटफटी गँगने पुन्हा डोकेवर काढले वेळीच या वाळुचोरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सध्या जिथे मिळेल तिथून वाळू काढण्याचे उद्योग सुरु असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पुलाखालुन, मोक्षघाटावरुन गागाभट चौकातुन व पुरातन नागघाटावरु तसेच पाटेगाव पुल तथा आयटीआयच्या मागच्या बाजुने फटफटी गॅग वाळुउपसा करुन वाहातुक करीत आहे. गेल्या महिनाभरापुर्वी या वाळुचोरीची दखल थेट जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी घेऊन स्वतः स्थळ पाहणी करुन या वाळुचोरांच्या मुसक्या आवळण्याच्या सुचना पैठणला येऊन तालुका प्रशासनाला केल्या होत्या.

यावेळी तालुका प्रशासनाच्यावतीने तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी शहरातील गोदापाञत जाणाऱ्या रस्त्यांवर जेसीबीने चर खोदुन या फटफटी गँगचा बंदोबस्त केला होता, मध्यांतरी पोलिस प्रशासनाने कारवाया केल्याने थोड्याफार प्रमाणात या वाळुचोरांवर अंकुश लागले होते.
मात्र गेल्या दोन दिवसापासुन गागाभट चौक व पुरातन नागघाट परीसरात पुन्हा वाळुचोरणाऱ्या फटफटी गँगने धुमाकुळ घातलेला आहे, या प्रकरणी सामाजमाध्यमांवर प्रतिक्रीया उमटताच फटफटी गॅग गायब झाली खरी मात्र वातावरण थोड शांत झाल्यास हे वाळु चोरटे पुन्हा सक्रीय होणारच म्हणुन प्रशासनाने वेळीच या फटफटी गँगच्या मुस्क्या आवळायला हव्या. अशी मागणी स्थानिकांकडून आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!