Share

‘लवकर बरा हो चॅम्पियन!’ ; रिषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह आढळताचं हरभजनने व्यक्त केली चिंता

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : गेल्या काही दिवसापासुन भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर काही काळासाठी भारतीय संघ सुट्टीवर गेला होता. यानंतर आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ विलगीकरणात पोहोचणार होता, मात्र यादरम्यान दोन भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाची लागण झालेल्या दोन भारतीय क्रिकेटपटुपैकी एक खेळाडू हा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा असल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंड दौऱ्यातील न्युझीलंडविरुद्धच्या डब्ल्युटीसी सामन्यात रिषभ पंत हा भारतीय संघाचा सदस्य होता. डब्ल्युटीसी सामन्यानंतर भारतीय संघ २० दिवसाच्या सुटीवर गेला होता.

रिषभ पंत कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर येताच संघाचा माजी अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंहने फलंदाजाला लवकर बरे होण्यासाठी सोशल मीडिया पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पंत संघासोबत डरहॅम येथे बायो-बबलमध्ये दाखल होण्यासाठी प्रवास करणार असल्याचंही समजलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!