औरंगाबाद : वाळुची चोरटी वाहतूक करणारा डपंरचा पाठलाग करून शुक्रवारी (१९) सकाळी साडे दहा अकरा वाजेच्या सुमारास महसुलच्या पथकाने पकडुन बनोटी पोलीस चौकीत जमा करण्यात केला आहे. परंतु कारवाई करताना मात्र महसुलच्या पथकाला कोरोना नियमांचा विसर पडल्याचे दिसून आले, त्यामुळे गावभर डम्पर पकडण्यापेक्षा कोरोना नियमांचे उल्लान्घानाचीच जास्त चर्चा सुरु होती.
गेल्या काही दिवसांपासून सोयगाव तालुक्यातील बनोटी, गोदेंगाव,पळाशी, किन्ही आदी परीसरात वाळुची चोरटी वाहतूक चालु असल्याची माहिती महसुल विभागाला मिळाली होती त्यानुसार दोन दिवसापासुन महसूल पथक चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या मागावर होते. पहील्या दिवशी गोदेंगाव येथे एका ट्रक्टरवर कार्यवाही करण्यात आली तर दुसऱ्या दिवशी पाचोरा येथील संदीप मनजर यांच्या मालकीचे डपंर MH.04 CP.4232 वरठाण येथील गावात जाणाऱ्या रस्त्यावर पकडले असुन पंचनामा करुन वाळुने भरलेला डपंर बनोटी चौकीला जमा करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही साठी प्रस्ताव सोयगाव तहसिलला पाठविण्यात आला आहे.
पाचोरा कडुन आलेला वाळुच्या भरलेल्या डपंरास वरठाण गावाच्या मागे महसुल विभागाच्या पथकाने हात दिला. परंतु चालकाने डंपर न थांबवता सुसाट वेगाने धावला त्याच्या मागे महसूल पथक पाठलाग करीत असल्याने डंपर चालकाने वरठाण बसस्थानकावरुन सरळ गावाच्या दिशेने भरधाव वेगात निघाला फिल्मी स्टाईल पाठलाग सुरू असल्याने काही अंतरावर महसुलच्या पथकाने डंपर पकडले. सकाळची वेळ असल्याने नागरिक बसस्थानक परिसराजवळ उभे होते. तर लहान मुलं खेळत होती.त्यातच डंपर चालकाने वाळुने भरलेला डफंर वरठाण बसस्थानकवरून भरधाव वेगाने गावाकडे येत असताना नागरिकांमधून आरडाओरड सुरू केल्याने नागरिक व लहान मुलं मिळेल त्या दिशेने धावली यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा मोठा अपघात झाला असता.
महसूल पथकाने चोरटी वाहतूक करणारा डंपर पाठलाग करून वरठाण गावाजवळ पकडला. चालकास डंपर बनोटी चौकीत नेण्यास सांगितले मात्र चालकाने महसूल पथकाशी हुज्जत घातली.काही वेळाने चालक डंपर चौकीस नेण्यास तयार झाला मात्र वरठाण चौफुली जवळ येताच चालू गाडीत वाळू रस्त्यावर उभरण्याचा प्रयत्न केला त्यात बरीचशी वाळूचे ढीग रस्त्यावर पडली.महसूल पथकाच्या कर्मचारी डंपरास आडवा झाला त्यावेळी चालकाने डंपर भर रस्त्यात उभे केले पुन्हा महसूल विभागाच्या व डंपर चालकात हमरीतुमरी झाल्याने मोठी गर्दी जमा झाली होती तर काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती. अखेरीस महसूल पथकाचा कर्मचारी डंपर मध्ये बसला त्यानंतर चालकाने वाळूने भरलेले डंपर बनोटी चौकीत नेले.
चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपर वर कारवाई करणाऱ्या महसूल पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला मास्क नसल्याने नागरिकांमध्ये चर्चे विषय बनला होता.तहसीलदार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शासनाच्या निर्देशाचे पालन करण्यासंबंधी आवाहन करीत आहे. काही ठिकाणी तोंडाला मास्क नसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर महसूल कर्मचारीच तोंडाला मास्क लावत नसल्याने शासनाच्या निर्देशाची पायमल्ली करीत आहे. त्यांच्यावर तहसीलदार काय कारवाई करतात याकडे तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ऑनलाईन पेमेंटद्वारे शेतमालाचा दाम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात; राज्य सरकारचा निर्णय
- शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनाम्याबाबत मौन सोडलं, म्हणाले…
- जालन्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
- मा.आ हर्षवर्धन जाधवांनी टोल चालकांना घेतले फैलावर
- कोरोना वाढतोय : आज पुण्यात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

