औरंगाबाद : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सीईओ पदी नियुक्ती कोणाची नियुक्ती करायची हा राज्य सरकारचा निर्णय आहे. जर औरंगाबादमधील शिवसेनेचे स्थानिक नेते बाबासाहेब मनोहरे यांच्या येण्याने खूश नव्हते, तर राज्याने आधीच त्यांच्याशी बोलून निर्णय घ्यायला हवा होता. असा एकतर्फी निर्णय घेण्यापेक्षा सर्वांच्या सहमतीने निर्णय घेणे कधीही योग्यच’ अशी प्रतिक्रिया औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिली.
नगर विकास विभागाने काही दिवसांपूर्वी अचानक स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली. या नियुक्तीला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्थगिती दिलेली असतानाही मनोहरे उद्या सीईओपदी रुजू होणार आहेत. मनपा आयुक्त पांडेय यांचे या पदासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. यासंदर्भात भाजप आमदार अतुल सावे म्हणाले की, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांना असे तडकाफडकी पदावरून काढून टाकणे खरेतर चुकीचेच आहे.
मुख्यमंत्री शिवसेनेचे, पालकमंत्री शिवसेनेचे, संपूर्ण राज्य सरकार त्यांचे तरी हा विरोध कशासाठी ? विरोधाचा हा अट्टाहास का? कारण विरोध करणाऱ्यांना फक्त पब्लिसिटी हवी आहे. पांडेय हे खरोखर चांगले काम करत आहेत. अनेक विकासकामे करण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांना सीईओपदी कायम ठेवा ही आमची सुद्धा भूमिका आहे. राज्यात शिवसेनेचे सरकार असेल तर शहरातील स्थानिक नेत्यांना विरोध करण्याचा प्रश्नच उरत नाही. त्यांना जे हवे ते करवून घेऊ शकतात. हा निर्णय होण्याआधीच त्यांनी बोलायला हवे होते. विरोधाचा हा फार्स कशाला? त्यामुळे उगाच प्रसिद्धीसाठी वक्तव्य करणे टाळावे. असा खोचक टोला सावेंनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंना लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- मुकेश अंबानी उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
- अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है – जितेंद्र आव्हाड
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
