🕒 1 min read
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत असणारे रिलायन्सचे मुकेश अंबानी आतापर्यंत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. वर्षाच्या शेवटी त्यांच हे स्थान चीनच्या एका उद्योगपतीनं घेतलं आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी हे जगातील सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालयाची उभारणी भारतात करत आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार मुकेश अंबानी गुजरातमध्ये हे प्राणी संग्रहालय उभारणार आहे. या ठिकाणी त्यांचा समूहमार्फत तेल शुद्धीकरणाचा मोठा प्रकल्पही सुरू आहे. रिलायन्स समुहातील कॉर्पोरेट अफेअर्सचे अध्यक्ष पिरामल नाथवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्राणी संग्रहालय २०२३ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये स्थानिक सरकारच्या मदतीसाठी रेस्क्यू सेंटरदेखील असणार आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार रिलायन्सच्या प्रतिनिधींनी या प्रकल्पाची किंमत आणि अन्य कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. अंबानी यांची नेट वर्थ ८० अब्ज डॉलर्स इतकं आहे. यामध्ये त्यांचा टेक पासून ई-कॉमर्समधील व्यवसायाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; जालन्यात संपूर्ण गाव सील; परभणीत आठवडी बाजार बंद
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
- परभणीत ३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
- दीक्षाभूमी एक्स्प्रेसने मार्ग बदलला; जालना-औरंगाबादेतील उत्तर भारतीय नागरिकांची गैरसोय
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
