🕒 1 min read
औरंगाबाद : भगवा ध्वज हिंदुत्वाच्या विचाराचे प्रतीक, त्यागाचे, बलिदानाचे, ज्ञानाचे, सेवेचे प्रतीक आहे. दरवर्षी दिवाळीनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रम करतो, फराळाचे कार्यक्रम करतो, आतषबाजी करतो याबरोबरच यावर्षी शिवसेना नावीन्यपूर्ण पद्धतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले हिंदुत्वाचे विचार घराघरापर्यंत प्रत्येक माता-भगिनी पर्यंत पोहोचवून दिवाळी साजरी करणार आहोत. आमदार अंबादास दानवे ध्वज दिवाळी अभियानाप्रसंगी बोलत होते.
शिवसेनेच्या वतीने शहरात सोमवारपासून ध्वज दिवाळी अभियानास सुरूवात करण्यात आली. मंगळवारी पश्चिम शहरात प्रभाग निहाय अभियान राबविण्यात आले शहरातील शिवशंकर कॉलनी, उल्कानगरी, हनुमान मंदिर, रामकृष्णनगर, सातारा परिसर, इटखेडा, बन्सीलालनगर रेल्वेस्टेशन चौक, पदमपुरा, छावणी, पडेगाव याठिकाणी ध्वजारोहन उपक्रम घेण्यात आला. प्रत्येक वाॅर्डात नागरिकांनी तर स्वतःहून भगवे ध्वजाचे पूजन करून घरावर ध्वज उभारुन स्वयंस्फूर्तीने या अभियानात आपला सहभाग नोंदवला शहरातील वाॅर्डा-वाॅर्डात, घरा-घरांवर भगव्या ध्वजामुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे.
माजी महापौर नंदकुमार घोडेले माजी सभागृह नेता विकास जैन गजानन बारवाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जय विश्वभारती कॉलनी येथे ज्येष्ठ हदय रोग तज्ञ डाॅ. सतिष रोपळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करणयात आले. शिवसेनेद्वारे ध्वज दिवाळी अभियाना अंतर्गत शहरातील ५० हजार घरांवर भगवे ध्वज लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देत आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी शहरात भगवी दिवाळी म्हणून साजरी होणार असे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दिवाळीत नागरिकांचे दिवे विझविण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे; भाजपचा आरोप
- ‘माझ्या प्रेमाच्या सहवासात…’ म्हणत सोनालीच्या ‘त्या’ फोटोने वेधले लक्ष
- भाजपला आणखी एक धक्का! देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांचा दणदणीत विजय
- मी दाखवतो कोण पार्ट्या करतात; नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा
- ‘अहो राऊत, परमबीर सिंहांना अजून तुम्ही पदावरून दूर ही केलं नाही, अन्..’, भाजपचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
