🕒 1 min read
मुंबई : राज्यात ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार आहेत. त्याकरिता बुधवारी शालेय शिक्षण विभागाने राज्यभरातील शिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यात शिक्षण आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून राज्यात शाळा सुरू करण्याची तयारी केली जात असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
राज्यात शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहेत. यासाठी राज्यातील यात शहरी आणि ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक वातावरण असून आरोग्याच्या संदर्भात शाळांना अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यासाठी मदत घेण्यासाठी टास्क फोर्सची आणि त्यासोबत पालक संघटना यांची मदत घेतली जाणार असल्याचे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान, शाळा सुरू करण्याच्या मुद्द्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पक्षाच्या वतीने भूमिका स्पष्ट केली. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘शाळेमुळे मुले स्ट्रिक्ट होतात. स्मार्ट होतात. त्या वातावरणात मुले अभ्यास करतात. आता मुलांची वाढ खुंटली आहे. शाळा सुरू होत नसल्याने मुलांची घुसमट होत आहे’ असे ते म्हणाले.
येत्या ४ ऑक्टोबरपासून मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सर्व माध्यमाचे, सर्व बोर्डाचे आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून नियमित भरणार आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक नियमांचे पालन करून शाळा उघडण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. मात्र पालकांचे संमतीपत्र असेल तरच विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेच्या 50 हजार रुपये नुकसान भरपाईच्या मागणीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
- महिलांवरील अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब – निलम गोऱ्हे
- सहा महिन्यानंतर प्रत्येक सरकारी खात्यात ईलेक्ट्रिक वाहने असतील- आदित्य ठाकरे
- ओला दुष्काळ जाहीर करण्याचा विचार सुरु- विजय वडेट्टीवार
- ‘व्वा रे बिट्या… तुला कुणी सांगितलं ? महाराष्ट्रातील अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल म्हणून’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

