मुंबई : गुलाब चक्रिवादळाच्या प्रभावामुळे संपूर्ण कहाराष्ट्रात पाऊस झाला. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करायचा कि संपूर्ण राज्यात करायचा याचा विचार सुरु आहे. पावसाने झालेल्या नुकसानीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले, शेतकरी संकटात सापडल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार या दोघांनीही मदतीची भूमिका घ्यायची असते. यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मराठवाड्यातील ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाऊस ओसरला की १०० टक्के पंचनामे पूर्ण होतील. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील नुकसानीची माहिती गोळ्या झाल्यानंतर दुष्काळाबाबत निर्णय होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
१७ लाख हेक्टरचे नुकसान
शेतकरी संकटात आला की सर्वच पक्षाची शेतकऱ्यांना मदतीची मागणी असते. मराठवाड्यात १७ लाख हेक्टरचं नुकसान झाल्याची माहिती आहे. त्याहीपेक्षा अधिक नुकसान झालेले असू शकते, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी महापुराचे कारण जलयुक्त शिवार असल्याचे म्हंटले होते, त्यावरही वडेट्टीवार म्हणाले, अतुल देऊळगावकर तज्ज्ञ आहेत. त्यांची मत काय आहेत त्यावर विचार होईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत ताबडतोब जाहीर करा; राज ठाकरे यांची मागणी
- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार झाले ?
- सहा महिन्यानंतर प्रत्येक सरकारी खात्यात ईलेक्ट्रिक वाहने असतील- आदित्य ठाकरे
- पिंपरी चिंचवड : विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा 12 ऑक्टोबर रोजी ई-लिलाव
- आपल्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्षच नाही, त्यामुळे निर्णय कोण घेतंय याची कल्पना नाही – सिब्बल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

