पुणे : प्रदुषन कमी करण्यासाठी सर्वांनी ईलेक्ट्रिक वाहनांवर भर देण्याची गरज आहे. एप्रिल २०२२ पासून शासनाच्या प्रत्येक विभागाकडे ईलेक्ट्रिक वाहने असतील, अशी घोषणा पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारपरिषदेत नुकतीच केली आहे.
आदित्य ठाकरे पुण्यात वसुंधरा अभियानाची बैठक घेतली यावेळी ते बोलत होते. ते सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. २०३० पर्यंत पुणे शहरातील कार्बन न्यूट्रल कसे करता येईल यासाठी विषेश प्रयत्न करण्यात येणार आहेत, तसेच पुणे शहरात दर आठवड्याला पर्यावरण रक्षणासाठी नदीकाठी अनेक उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण रक्षण ही चळवळ कशी करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असेही आदित्य यावेळी म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी चिंचवड येथील कायनेटिक मोटर्स आणि पिंपरी येथील टाटा मोटर्स प्लांटला भेट दिली. यावेळी त्यांनी ईलेक्ट्रिकल वाहनांची पाहणी केली. राज्यातील पर्यावरण पुरक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आज मी पिंपरी, चिंचवड येथील ईलेक्ट्रिकल वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांना भेट देत असल्याचे आदित्य यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत ताबडतोब जाहीर करा; राज ठाकरे यांची मागणी
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- काँग्रेसमध्ये धुसफूस सुरूच : कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक ताबडतोब बोलावण्याची गुलाम नबी आझाद यांची मागणी
- आपल्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्षच नाही, त्यामुळे निर्णय कोण घेतंय याची कल्पना नाही – सिब्बल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

