Share

शहरात कोरोनासह म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, घाटीत ‘एवढे’ रुग्ण घेताहेत उपचार!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पोस्ट कोविड रुग्णांना आता म्युकरमायकोसिस होत असल्याचे सांगितले जात आहे. घाटीत भरती झालेल्या रुग्णांना कोरोना बरोबरच लवकर म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना आणि म्युकरमायकोसिसची अशा दोन्हींवर उपचार करण्याचे आव्हान डॉक्टरांपुढे उभे आहे. गेल्या दोन दिवसात दोन कोरोना रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूला कोरोना सह म्युकरमायकोसिस कारणीभूत ठरला आहे.

मधुमेह, कोरोना उपचारात स्टेरॉईडचा वापर, ऑक्सिजन बाटल्यांमध्ये डिस्टिल्ड वॉटर वापरण्याकडे दुर्लक्ष यासह अन्य कारणांनी म्युकरमायकोसिसची लागण होते. जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २०० च्या वर आहे. यात पोस्ट कोविड रुग्णांबरोबर कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. एकट्या घाटी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कान-नाक-घसा विभागाद्वारे सांगण्यात आले, सध्या या ठिकाणी ३० रुग्ण आहेत. त्यांच्यावर कोरोना सह म्युकरमायकोसिसवर उपचार सुरू आहेत. प्रकृती गंभीर असलेले कोरोना रुग्ण अनेक दिवस रुग्णालयात असतात. अशावेळी त्यांना म्युकरमायकोसिसची लागण होते. म्युकरमायकोसिस जास्त पसरू नये म्हणून रुग्णांना इंजेक्शन दिले जाते. रुग्णांचा बचाव होईल या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे, तज्ज्ञांनी सांगितले. घाटीत सध्या प्रकृती गंभीर असलेल्या तब्बल ३३३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!