Share

पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी; जयंत पाटील यांचा केंद्रावर हल्लाबोल 

Published On: 

मुंबई  – पीएम केअरच्या माध्यमातून मिळालेल्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रसरकारवर हल्ला चढवला आहे.

पीएम केअरच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळालेल्या १५० व्हेंटिलेटरपैकी ११३ व्हेंटिलेटर निकामी निघाले असल्याचे समजते आहे तसेच मुंबई उच्च न्यायालयाने केंद्राला याबाबत उत्तर देण्यास सांगितले असल्याचीही बातमी आहे. यावरून मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पीएम केअरच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळालेल्या १५० व्हेंटिलेटरपैकी ११३ व्हेंटिलेटर निकामी निघाल्याची बातमी ऐकली. यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उपस्थित झाला आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. या मागचा सुत्रधार कोण ? कोण गैरफायदा घेत आहे ? याचा छडा लागायला हवा असेही जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!