Share

कोरोनावर मात केलेला रिषभ पंत मास्कमुळे झाला ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील डब्ल्युटीसी सामना गमावल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू हे २० दिवसाच्या सुटीवर गेले होते. या दरम्यान इंग्लंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच होता. यादरम्यान भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनावर मात करत रिषभ पंत २२ जुलै रोजी भारतीय संघात परतला. यासंदर्भात रिषभ पंतचा फोटो बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली. मात्र या ट्विटमधील फोटोत रिषभ पंतने जो मास्क घातला त्यामुळे तो पुन्हा ट्रोल होत आहे. या मास्कमध्ये एक कार्टुन पात्र जिभ बाहेर काढत आहे. या मास्कला बघून अनेक सोशल मीडीया युजर्सनी त्याला आधीच मास्क घातला असता तर ही वेळच आली नसती.

https://twitter.com/veenusg1/status/1418000919266959363

इंग्लंड दौऱ्यातील डब्ल्युटीसी स्पर्धेंच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ सुटीवर गेला होता. यादरम्यान रिषभ पंतने युरोकप स्पर्धेच्या काही सामन्याला हजेरी लावली होती. यावेळी त्याने मास्क परिधान केल्याचे दिसुन येत होते. काही दिवसातच त्याला कोरोनाची लागण झाली. उपचारानंतर १८ जुलै रोजी त्याचा विलगीकरणाचा कालावधी संपुष्टात आला. ५ ऑगस्टपासुन सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठीही तो उपलब्ध असेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!