श्रीलंका : भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात श्रीलंका आणि भारत संघात सध्या ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील अखेरचा सामना आज शुक्रवारी (२३ जुलै) होणार आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय टीमने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे.
आता टीम इंडिया तिसरी मालिका जिंकत श्रीलंकेला व्हाईट वॉश करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. धवन ब्रिगेडने जर तिसरा सामना जिंकला तर तो एक विक्रम आपल्या नावावर करेल. दरम्यान, भारताने वनडे मालिका आधीच खिशात घातली असल्याने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कर्णधार म्हणून शिखर धवनच्या नावावर पहिल्या वनडे मालिकेत क्लीन स्वीपचा खास विक्रम होईल. एमएस धोनी, विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यासारखे वनडेमध्ये कर्णधार देखील ही कामगिरी करू शकले नाहीत. धोनी वनडेमध्ये टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराट कोहलीने कर्णधार म्हणून पहिला एकदिवसीय सामना जून 2013 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. श्रीलंकेने भारताला 161 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. तसेच माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला देखील पहिला वनडे सामना जिंकता आला नाही. गांगुलीने कर्णधार म्ह्णून फक्त पहिल्या 3 सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या
- इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला दुखापतीने ग्रासले, बीसीसीआय करणार निवड समितीशी चर्चा
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- अखेर रसिका आणि असिफ यांचा बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह पडला पार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

