🕒 1 min read
मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनांना दिल्या. ते कोविड परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.
तर, गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मजुरांची नोंदणी करण्याची सूचना राज्य शासन आता प्रत्यक्षात उतरवणार आहे. गेल्यावर्षी राज ठाकरे यांनी ही सूचना केली होती, मात्र त्याकडे राजकारण म्हणून पाहिलं गेलं. आता कोरोना वाढल्यावर सरकारला हे पुन्हा सुचलं हे चांगलं आहे, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या
- ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; ट्रक चालक फरार
- भारताला अमेरिकेचा मदतीचा हात ; मेडिकल साहित्याची पहिली खेप भारतात दाखल
- ‘दुर्बलांसाठी जाहीर पॅकेजचे लाभ विनाविलंब द्या,प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे’
- भाजपा आमदाराच्या मृत्यूनंतर ‘धन्य आहेत योगीजी मोदीजी’ म्हणत मुलगा संतापला
- ‘हे अॅवार्ड्स ठेवायला नविन सुटकेस हवी’ पृथ्वीच्या खेळीनंतर गर्लफ्रेंड प्राचीने केली स्तुती


